रविवार, २५ डिसेंबर, २०१६

sonali

सोनाली !!!
सोनाली आज तिच्या जिवाभावाच्या शाळेतल्या मैत्रिणीकडे म्हणजे चित्रा कडे गेली होती खरंतर खूप दिवस चित्रा तिला पत्रं पाठवून बोलावत होती ह्यावेळेस तर तिने चक्कं खूप आग्रह केला आणि फोन करून बोलावून घेतले . तसं सोनाली आणि चित्रा शाळेतल्या जिवलग मैत्रिणी पण दोघीनीं ठरवलेलं फोन वर आणि पत्र एकमेकांना पाठवून तरी संपर्कात राहायचं!!!
सोनाली त्यादिवशी दुपारी ३ वाजता चित्रा च्या घरी पोहोचली तसंही दोघे एकाच शहरात नाशिक मध्ये राहत असल्याने सोनालीने घरी कळवलेले कि घरी परत ३-४ तासात परत येईन. दोघींना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला शाळा सोडून मध्ये १-२ वेळा सोडल्यास जवळजवळ ५ वर्षांनी निवांत भेटत होते . सोनालीचे तर घरी खूप छान स्वागत झाले काका , काकू , तिची ताई सगळेच छान बोलले फक्त तिचा मोठा भाऊ मात्र शांत होता कदाचित संकोचत असावा बोलायला .
चित्रा आता सोनालीला वेगळीच वाटत होती शाळेपेक्षा .... शाळेत शांत ,संयमी, गोड आणि सॉफ्ट बोलणारी चित्रा आता मात्र खूप गर्विष्ठ आणि aggressive वाटत होती . वेगळ्याच धुंदीत होती . आपल्या ताई वर खूप प्रेम करणारी , तिला मानणारी चित्रा आता मात्र तिच्याशी चिडून आणि तुटक तुटक बोलत होती . सोनालीला ते खटकत होतं आणि अशी का वागतेय हे खटकत होतं शेवटी न राहवून विचारलंच सोनाली ने कि "चित्रा तू अशी का बदललीये ?? तू काहीतरी लपवतीयेस ? "
चित्रा म्हणाली सोनालीला, " मी मुद्दामच तुला बोलावून घेतलंय ..मला काहीतरी सांगायचंय..खूप महत्वाचा आहे आणि मी खूप confused आहे काय करावे .. काय निर्णय घ्यावा काळात नाही !! "
सोनालीला तिच्या बोलण्या हावभावावरून कळले आणि हसतच म्हणाली, " कोणी आवडतो कि काय ? कि कोणी तू आवडतेस असं म्हणतंय ??"
चित्रा एकदम आनंदाने चमकलीच ! " तुला कसं कळलं ?? " सोनाली परत हसत म्हणाली, " ते महत्वाचे नाही तू बोल जे तुझ्या मनात आहे .. "
चित्रा आनंदाने आणि उत्साहाने सांगायला लागली, "अगं तो समोरच राहतो .. समोरच्या बंगल्यात.. खूप चांगला आहे साधा आहे तसा दिसायला .. पण खूप शांत आहे स्वभावाने ..माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असेन " " एक आठवड्यापुर्वी तो भेटलेला टेलिफोन बूथ जवळ मी कोणाला तरी फोन करायला गेले तेव्हा तो तिथे होता आणि तो म्हणाला कि मला तू आवडतेयस लहानपणापासून ,तुला मी आवडतो का ? " अगं मी खूप शॉक झाले कारण असं कोणी आत्तापर्यंत विचारलं नाही .. पण माहित नाही का पण २ दिवसांनी मला पण तो आवडायला लागलाय " चित्रा लाजत लाजत सांगत होती ..
सोनाली मनातल्या मनात हसत म्हणाली, "अगं होतं असं कधी कधी ... वेडी आहेस !!! आपलं हे वयच असं कि कोणीही आवडतो आणि आपल्याला कोणीतरी आवडते त्यापेक्षा आपण कोणालातरी आवडतो हेच खूप छान आणि भारी feeling आहे !.. तू खूप नशीबवान आहे कि असं काही लाईफमध्ये घडतंय !! पण मी नाही गं तेवढी नशीबवान !!!!"
खरंतर १८-१९ वय... वेडं वय !!... त्या वयात मुलं आणि मुली वेगळ्याच धुंदीत असतात .. ना अजून matured झालेले ना innocent राहिलेले... एक वेगळाच उत्साह जिद्द असते .. डोळ्यांत स्वप्नं असतात .. वास्तवाचं भान असतं पण फारच कमी ! त्या वयात सगळेच स्वतःच्याच प्रेमात इतके असतात की दुसऱ्याच्या प्रेमात पडायला असा कितीसा वेळ लागेन !!!
चित्रा त्याच्याबद्दल अजून बरंच काही सांगत होती तेवढ्यात तिची ताई आली पण चित्राने तिच्याशी rude पणे बोलून दुसऱ्या खोलीत जायला सांगितले .
हे असे वागणे बघून सोनाली म्हणाली चित्राला, " अगं ताई शी असं का वागतेय , तुला तर शाळेत असताना ताई खूप आवडायची , सारखं ताई ताई करायचीस "
चित्रा म्हणाली, " आता नाही आवडत मला ताई .. सारखं मला समजावत असते बहुतेक त्या मुलाचं कळलंय तिला म्हणून सारखी संशय घेते .. तिला पण आवडतो ना तो पण त्याला मीच आवडले .." चित्रा गर्वाने सांगत होती ..
सोनाली मात्र आता खरंच अस्वस्थ होत होती ..काहीतरी चुकीचे आहे हे जाणवत होते .. पण काय ?
सोनाली अजून माहिती घेत होती चित्रा कडून त्याच्या बद्दल यावरुन काही माहिती मिळाली की तो वेगळ्याच जातीचा होता , त्याच्या घरी त्याचे आई बाबा आणि बहीण होती .. आई गल्ली मध्ये बरीचशी आक्रमक ,भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध होती , काका विक्षिप्त स्वभावाचे आणि त्याची बहीण ही लोकल पातळीवर modeling करत होती.. चित्राने खूप कौतुकाने हे बघ त्याच्या बहिणीचा हा फोटो ... tailor जाहिरातीत खुपसा modern , mini स्कर्ट मधील खूप खराब असा फोटो होता तो फोटो पाहून तर सोनाली शॉकच झाली (मॉडर्न राहण्यात काहीच गैर नाही ..उलट आजकाल चांगलंच आहे .. मॉडर्न पण classy, elegant दिसतात असतात पण सगळेच तसे वाटत नाहीत आणि तो काळ २००१-२००२ चा असेन असं मी मानतेय ).
हे कुटुंब चित्रा साठी योग्य नव्हे असं आता मनातून सोनाली ला वाटत होते. चित्रा मात्र कौतुकाने तो मुलगाच त्यांच्या कुटूंबात सगळयात शांत आणि चांगला आहे असं ठाम पणे सांगत होती ..
सोनाली म्हणाली " मी भेटू शकते का त्या मुलाला ?? " चित्र म्हणाली " अगं मीच भेटले नाहीये त्या दिवसानंतर .. "
सोनाली "बरं' म्हणाली .. मग चित्रा म्हणाली "हा बघ समोरचा त्याचा बंगला " संध्याकाळचे ७ वाजलेले थोडा अंधार पडलेला ..पण तो बंगला मोठा आणि भारी वाटत होता .. तेवढ्यात लक्षात आले तिथे गच्चीवर कोणीतरी आहे .. हो ..तोच मुलगा होता .. खुपसा बारीक , काळासावळा , चष्मा असलेला .. त्याने दोघींकडे पहिले .. चित्रा त्याच्याकडे बघून हसली आणि तो लगेच आतमध्ये गेला अगदी ओळख पण दाखवली नाही !!! पण चित्रा कौतुकाने म्हणाली अगं बहुतेक ऑकवर्ड झाला असेन ...
आता मात्र सोनालीला कळून चुकले हा मुलगा काही बरोबर नाही जो आत्ताच एवढा घाबरतो तो हिला काय साथ देईन . त्यात ह्या मुलाची आई भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध तर चित्रा तशी मुळात शांत, खूप सॉफ्ट बोलणारी कसं जमणार ?.. त्यात त्यांचे घरचे वातावरण वेगळे .. चित्रा साधीच राहायला आणि त्याच्या घरचे बरेचसे मॉडर्न .. ती पण मॉडर्न बनेन पण असं बदलताना त्रास होणारच ना .... चित्राच्या घरचे गरीब साधे तो मुलगा बराच श्रीमंत ..त्याच्या घरच्यांच्या काही अपेक्षा असणारच.. त्यात दोघांची जात वेगळी .. तिच्या घरच्या पेक्षा त्याच्या घरचे खरंच accept करतील ? तिला काही टोमणे मारले तर ? त्रास दिला तर ..?? अनेक प्रश्न होते .. चित्रा पुढे प्रेमाचे धुके होते त्यामुळे पुढचे प्रश्न तिला दिसणे शक्यच नव्हतं ..
सोनाली तिला हे सर्व सांगणार तेवढ्यात तिच्याकडे तिचा एक चुलत भाऊ आला मग ती आणि सोनाली त्याच्याशी झोका , प्रपंच , श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या सिरीयल गप्पा बद्दल मारत बसले . पण तेवढद्यात खूप जोरात पाऊस पडायला लागला तो हि चक्कं मे महिन्यात !! आधी बरंच वादळ आणि नंतरचा पाऊस ( निसर्ग अनेक संकेत देत असतो ..आपणच लक्ष देत नाही .. हि अंधश्रद्धा नाही ... अनुभव आहे ) .. सोनाली ला जायचे होते घरी निदान ८ पर्यंत तरी .. तिचा चुलत भाऊ म्हणाला मी सोडतो माझ्याकडे स्कुटर आहे ..
सोनाली खुश झाली पण मनातून वाटत होते नको जायला एका अनोळखी मुलाबरोबर !! तेवढ्यात चित्राचे बाबा म्हणाले " मुली , एवढ्या पावसात मी तुला पाठवू शकत नाही आज रात्री इथेच राहा .. घरी फोन करून कळव ..काळजी करू नकोस .. " सोनालील बरं वाटले आणि ते पटलेही तिने घरी फोन करून कळवले आणि घरच्यांनीही पण चक्कं कधी नव्हे ते परवानगी दिली ...
मग दोघीनी खूप गप्पा मारल्या .. जेवण केले .. जेवताना सोनाली सगळ्याशी बोलत होती अगदी चित्राच्या चुलत भावशीही .अगदी सहज .. निरागस पणे . पण चुलत भाउशी बोलताना का कोणास ठाऊक पण चित्राच्या भावाला आवडत नव्हते चक्कं तो तिथून उठून गेला .. सोनालीला थोडे वाईट वाटले आणि खटकलेही .. मनाने समजूत घातली आपण आलेलो कदाचित आवडले नसावे ... चुलत भाऊ मग स्कुटर ने त्याच्या घरी एकटाच गेला ..
त्या दिवशी सोनाली चित्र कडेच राहिली .रात्रभर पण दोघी बोलत होते ..काकू मात्र वैतागलेल्या !!
दुसऱ्या दिवशी सोनाली आणि चित्रा आवरून आता घरी जाणार तेवढ्यात काकू म्हणाल्या, "अगं इथपर्यंत आलीच आहेस तर देवीचे मंदिर आणि जैन मंदिर पाहून जा ".. चित्रा पण म्हणाली "अगं चल ना ..खूप सुंदर आहे मंदिर " काकू म्हणाल्या चित्राला " दादाला सोबत घेऊन जा ..कारण मंदिर पहाडावर आहे आणि माणसांची गर्दी पण कमी आहे ".. तिचा दादा पण चक्कं तयार झाला ...
मंदिर खूप सुंदर होते कधी नव्हे ते चित्राचा भाऊ थोडाच पण बोलत तरी होता ..माहिती सांगत होता . सोनालीला कौतुक वाटले किती सज्जन आहे हा मुलगा .. काल आलेला तिचा चुलत भाऊ खूप वेगळ्या नजरेने बघत होता आणि हा कसा निर्मळ .. आपल्याला जर कोणी भेटले तर तो असाच असावा !! आपला ११वी ला ऍडमिशन घेताना चित्रा आणि सोनाली भेटलेलो कॉलेज ला तेव्हा हा पण होता सोबत तर ह्यानेच आपले तेव्हा हात दुखत होते म्हणून चक्कं पूर्ण टाइम टेबल लिहून दिलेले वहीत.. अर्थात चित्राचा भाऊ हा आपलाही भाऊ .. त्यामुळे वेगळे विचार नकोत यायला ..
मंदिर पाहून आल्यावर सोनाली घरी जाण्या अगोदर दोघी चित्राच्या खोलीत गप्पा मारत होते .. ..
सोनाली म्हणाली, "आता आपण महत्वाचे बोलू या .. "
चित्रा उत्सुक होतीच ऐकायला ..सोनाली serious पणे म्हणाली, " तो मुलगा चांगला आहे मान्य आहे .. एकमेकांना आवडता हे पण खरंच आहे .. ..पण खरंच त्याची लग्नाची तयारी आहे ?? तुझी पण वेगळ्या लोकांशी जुळवून घेण्याची तयारी आहे ?? आपले आणि त्यांचे विचार वेगळे आहेत .. आर्थिक परिस्थिती पण वेगळी आहे ?? तुझ्या घरचे साधे आहेत .. हा धक्का पचवू शकतील ?? मुलाच्या घरचे तुला accept करतील ?? "
चित्रा रागाने म्हणाली ," हो .. तो डॅशिंग आहे दिसत नसला तरी!! ..तो घरच्यांशी माझ्यासाठी बोलायला तयार होईन आणि हो माझ्याशी लग्न करेन सगळ्याचा विरोध पत्कारून .."
सोनाली म्हणाली ,"अगं काल त्या मुलाने तुला काल पाहिल्यावर घरात पळून गेला तो तुझ्यामागे ठाम राहील ??मला नाही वाटत तो तुझ्याशी लग्न करेन !!, सॉरी पण मला जे वाटलं ते बोलले कदाचित मी चुकीची पण असेन "
चित्रा हे ऐकून गारच पडली आणि चक्कं तिचा चेहरा पडला .. कदाचित सोनाली तिची बाजू घेईन असं वाटलं असेन .. चित्रा आता खरंच
अस्वस्थ होत होती !!
सोनाली म्हणाली " चित्रा !! मला वाटतं तू त्याच्याशी स्पष्ट बोलावं ..मगच काय ते कळेन.. उगाच तू जास्त गुंतू नकोस ..अपेक्षा ठेऊ नकोस आणि हो चित्रा ... तू त्याला भेटू नकोस जो पर्यंत व्यवस्थित उत्तर येत नाही ! "
चित्रा म्हणाली ,"म्हणजे?? काय बोलू मी त्याच्याशी ??"
सोनाली म्हणाली ," तू फक्तं म्हण मलाही तू आवडतोस आणि मलाही तुझ्याशी लग्न करायचंय .. जर मी खरंच आवडत असेन तर माझ्या घरी माझ्या बाबांशी बोलायला ये !! "
चित्रा आनंदाने म्हणाली ," हो ! मी असंच बोलेन !"
आता मात्र चित्रा रिलॅक्स झाली होती आणि सोनाली मात्र अस्वस्थं !! कदाचित सोनालीला पुढचे अगोदरच कळलेले कि काय ....
सोनाली आता घरी जायला निघाली कारण सकाळचे ११ वाजलेले ..घरी सकाळी फोने करून कळविलेले लवकर येईन म्हणून ..
काका, काकू,ताई चा निरोप घेऊन निघाली . चित्राचा दादा मात्र दिसला नाही आता खूपच सोनाली ला वाईट वाटत होते .. साधा निरोप पण देऊन नये ???
इतके आपण आवडत नाही माणूस म्हणून ..
सोनालीने जाताना चित्राला बाय करायचे म्हणून मागे वळून पहिले तिच्या घराकडे तर तिचा दादा चक्क बाल्कनीत उभा होता आणि सोनाली कडे वेड्यासारखा बघत होता .. .. त्याचे डोळे काहीतरी सांगत होते ..जणू काही आपली ही शेवटची भेट !! सोनालीला वेगळंच वाटलं पण हा आपल्या मनाचा वेडेपणा असं समजून तिनेही त्याला सहजच हसत हसत बाय केले ..
२ महिने झाले .. सोनाली कडे चित्राचे एक पत्रं आले ..नेहमीप्रमाणे छान उलट जास्त संयमित आणि matured वाटत होते पत्रं .. अगदी २ पानी .. सोनालीला उतुकात होती चित्राच्या आयुष्यात (?) आलेल्या त्या मुलाची .. शेवटचा पॅराग्राफ होता .. सहज लिहिलेला .. चित्राने लिहिलेलं "अगं त्या मुलाला मी विचारलं तू जे म्हणालीस ते पण त्यानंतर दोन आठवड्यानंतर त्याचे आई -बाबा आले माझ्या आई -बाबांना भेटायला आले ....... कशासाठी माहितेय का ?? त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन !!! ..... असो मला खूप वाईट वाटलं पण .. पण .. मी आता बरीच सावरलेय आणि विसरतेयही तसाही तू सल्ला दिलेलास कि जास्त गुंतू नकोस म्हणून ..तर तु काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे "
सोनालीला मात्र हे वाचून धक्का बसला आणि गप्प झाली .. बघता बघता तिच्या डोळ्यात पाणी कधी भरून आले कळलं नाही!!!!!!!!.. जणू तिचे स्वतःचेच स्वप्नं भंग पावले .... स्वप्नातून आता चित्रा नाही तर सोनालीच जागी झाली होती...... वास्तवाचे काटे जाणवू लागले .. सोनालीचे डोळे अजूनही भरून येतात .. जणू आपल्यामुळेच हे घडले असं तर तिला वाटत नाही ?? कि तिचे पण स्वप्नाळू जग तेव्हाच संपले कि काय हे जाणवू लागले ?? देव जाणे !!!! ...
सोनालीने मात्र नंतर चित्रा शी संपर्क नंतर मुद्दाम कमी ठेवला ..चित्राला अजूनही कळले नाही सोनालीने तिच्याशी संपर्क का तोडला ते.. कारण कारण फक्त सोनालीलाच माहित !!!!
-- वृंदा ( हि कथा काल्पनिक आहे त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही ..त्यामुळे कोणीही निदान चुकीचे तर्क करू नयेत )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा