रविवार, २५ डिसेंबर, २०१६

dev ani prem

आपल्या भारत देशात अनेक साधुसंत होऊन गेले .... .सगळ्यांनी एकच सांगितले देवावर विश्वास ठेवा .....देवावर भक्ती ,प्रेम करा .....सगळं चांगला होईन खरंतर त्यात एक लपलेला संदेश होता . तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा ......स्वतःवर भक्ती (स्तुती - appreciation ) करा आणि मुख्य म्हणजे स्वतः वर प्रेम करा ...मग सगळं चांगलं होईन .. कसं काय माहितेय ?? !!! कारण देव कुठे असतो ? सगळीकडे अगदी प्रत्येक अणुरेणूत .. झाडात , दगडात,फुलात, पाण्यात , हवेत ,मातीत ,पक्षात , प्राण्यांत आणि मुख्य म्हणजे माणसात ..म्हणजेच स्वतःत <3...आहे कि नाही मजा !!! :) ;) <3
( a = b , b = c means a = c ...... प्रेम = देव , देव =स्वतः means प्रेम = स्वतः ) --- वृंदा ( mathematician of love madness ) <3

sonali

सोनाली !!!
सोनाली आज तिच्या जिवाभावाच्या शाळेतल्या मैत्रिणीकडे म्हणजे चित्रा कडे गेली होती खरंतर खूप दिवस चित्रा तिला पत्रं पाठवून बोलावत होती ह्यावेळेस तर तिने चक्कं खूप आग्रह केला आणि फोन करून बोलावून घेतले . तसं सोनाली आणि चित्रा शाळेतल्या जिवलग मैत्रिणी पण दोघीनीं ठरवलेलं फोन वर आणि पत्र एकमेकांना पाठवून तरी संपर्कात राहायचं!!!
सोनाली त्यादिवशी दुपारी ३ वाजता चित्रा च्या घरी पोहोचली तसंही दोघे एकाच शहरात नाशिक मध्ये राहत असल्याने सोनालीने घरी कळवलेले कि घरी परत ३-४ तासात परत येईन. दोघींना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला शाळा सोडून मध्ये १-२ वेळा सोडल्यास जवळजवळ ५ वर्षांनी निवांत भेटत होते . सोनालीचे तर घरी खूप छान स्वागत झाले काका , काकू , तिची ताई सगळेच छान बोलले फक्त तिचा मोठा भाऊ मात्र शांत होता कदाचित संकोचत असावा बोलायला .
चित्रा आता सोनालीला वेगळीच वाटत होती शाळेपेक्षा .... शाळेत शांत ,संयमी, गोड आणि सॉफ्ट बोलणारी चित्रा आता मात्र खूप गर्विष्ठ आणि aggressive वाटत होती . वेगळ्याच धुंदीत होती . आपल्या ताई वर खूप प्रेम करणारी , तिला मानणारी चित्रा आता मात्र तिच्याशी चिडून आणि तुटक तुटक बोलत होती . सोनालीला ते खटकत होतं आणि अशी का वागतेय हे खटकत होतं शेवटी न राहवून विचारलंच सोनाली ने कि "चित्रा तू अशी का बदललीये ?? तू काहीतरी लपवतीयेस ? "
चित्रा म्हणाली सोनालीला, " मी मुद्दामच तुला बोलावून घेतलंय ..मला काहीतरी सांगायचंय..खूप महत्वाचा आहे आणि मी खूप confused आहे काय करावे .. काय निर्णय घ्यावा काळात नाही !! "
सोनालीला तिच्या बोलण्या हावभावावरून कळले आणि हसतच म्हणाली, " कोणी आवडतो कि काय ? कि कोणी तू आवडतेस असं म्हणतंय ??"
चित्रा एकदम आनंदाने चमकलीच ! " तुला कसं कळलं ?? " सोनाली परत हसत म्हणाली, " ते महत्वाचे नाही तू बोल जे तुझ्या मनात आहे .. "
चित्रा आनंदाने आणि उत्साहाने सांगायला लागली, "अगं तो समोरच राहतो .. समोरच्या बंगल्यात.. खूप चांगला आहे साधा आहे तसा दिसायला .. पण खूप शांत आहे स्वभावाने ..माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठा असेन " " एक आठवड्यापुर्वी तो भेटलेला टेलिफोन बूथ जवळ मी कोणाला तरी फोन करायला गेले तेव्हा तो तिथे होता आणि तो म्हणाला कि मला तू आवडतेयस लहानपणापासून ,तुला मी आवडतो का ? " अगं मी खूप शॉक झाले कारण असं कोणी आत्तापर्यंत विचारलं नाही .. पण माहित नाही का पण २ दिवसांनी मला पण तो आवडायला लागलाय " चित्रा लाजत लाजत सांगत होती ..
सोनाली मनातल्या मनात हसत म्हणाली, "अगं होतं असं कधी कधी ... वेडी आहेस !!! आपलं हे वयच असं कि कोणीही आवडतो आणि आपल्याला कोणीतरी आवडते त्यापेक्षा आपण कोणालातरी आवडतो हेच खूप छान आणि भारी feeling आहे !.. तू खूप नशीबवान आहे कि असं काही लाईफमध्ये घडतंय !! पण मी नाही गं तेवढी नशीबवान !!!!"
खरंतर १८-१९ वय... वेडं वय !!... त्या वयात मुलं आणि मुली वेगळ्याच धुंदीत असतात .. ना अजून matured झालेले ना innocent राहिलेले... एक वेगळाच उत्साह जिद्द असते .. डोळ्यांत स्वप्नं असतात .. वास्तवाचं भान असतं पण फारच कमी ! त्या वयात सगळेच स्वतःच्याच प्रेमात इतके असतात की दुसऱ्याच्या प्रेमात पडायला असा कितीसा वेळ लागेन !!!
चित्रा त्याच्याबद्दल अजून बरंच काही सांगत होती तेवढ्यात तिची ताई आली पण चित्राने तिच्याशी rude पणे बोलून दुसऱ्या खोलीत जायला सांगितले .
हे असे वागणे बघून सोनाली म्हणाली चित्राला, " अगं ताई शी असं का वागतेय , तुला तर शाळेत असताना ताई खूप आवडायची , सारखं ताई ताई करायचीस "
चित्रा म्हणाली, " आता नाही आवडत मला ताई .. सारखं मला समजावत असते बहुतेक त्या मुलाचं कळलंय तिला म्हणून सारखी संशय घेते .. तिला पण आवडतो ना तो पण त्याला मीच आवडले .." चित्रा गर्वाने सांगत होती ..
सोनाली मात्र आता खरंच अस्वस्थ होत होती ..काहीतरी चुकीचे आहे हे जाणवत होते .. पण काय ?
सोनाली अजून माहिती घेत होती चित्रा कडून त्याच्या बद्दल यावरुन काही माहिती मिळाली की तो वेगळ्याच जातीचा होता , त्याच्या घरी त्याचे आई बाबा आणि बहीण होती .. आई गल्ली मध्ये बरीचशी आक्रमक ,भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध होती , काका विक्षिप्त स्वभावाचे आणि त्याची बहीण ही लोकल पातळीवर modeling करत होती.. चित्राने खूप कौतुकाने हे बघ त्याच्या बहिणीचा हा फोटो ... tailor जाहिरातीत खुपसा modern , mini स्कर्ट मधील खूप खराब असा फोटो होता तो फोटो पाहून तर सोनाली शॉकच झाली (मॉडर्न राहण्यात काहीच गैर नाही ..उलट आजकाल चांगलंच आहे .. मॉडर्न पण classy, elegant दिसतात असतात पण सगळेच तसे वाटत नाहीत आणि तो काळ २००१-२००२ चा असेन असं मी मानतेय ).
हे कुटुंब चित्रा साठी योग्य नव्हे असं आता मनातून सोनाली ला वाटत होते. चित्रा मात्र कौतुकाने तो मुलगाच त्यांच्या कुटूंबात सगळयात शांत आणि चांगला आहे असं ठाम पणे सांगत होती ..
सोनाली म्हणाली " मी भेटू शकते का त्या मुलाला ?? " चित्र म्हणाली " अगं मीच भेटले नाहीये त्या दिवसानंतर .. "
सोनाली "बरं' म्हणाली .. मग चित्रा म्हणाली "हा बघ समोरचा त्याचा बंगला " संध्याकाळचे ७ वाजलेले थोडा अंधार पडलेला ..पण तो बंगला मोठा आणि भारी वाटत होता .. तेवढ्यात लक्षात आले तिथे गच्चीवर कोणीतरी आहे .. हो ..तोच मुलगा होता .. खुपसा बारीक , काळासावळा , चष्मा असलेला .. त्याने दोघींकडे पहिले .. चित्रा त्याच्याकडे बघून हसली आणि तो लगेच आतमध्ये गेला अगदी ओळख पण दाखवली नाही !!! पण चित्रा कौतुकाने म्हणाली अगं बहुतेक ऑकवर्ड झाला असेन ...
आता मात्र सोनालीला कळून चुकले हा मुलगा काही बरोबर नाही जो आत्ताच एवढा घाबरतो तो हिला काय साथ देईन . त्यात ह्या मुलाची आई भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध तर चित्रा तशी मुळात शांत, खूप सॉफ्ट बोलणारी कसं जमणार ?.. त्यात त्यांचे घरचे वातावरण वेगळे .. चित्रा साधीच राहायला आणि त्याच्या घरचे बरेचसे मॉडर्न .. ती पण मॉडर्न बनेन पण असं बदलताना त्रास होणारच ना .... चित्राच्या घरचे गरीब साधे तो मुलगा बराच श्रीमंत ..त्याच्या घरच्यांच्या काही अपेक्षा असणारच.. त्यात दोघांची जात वेगळी .. तिच्या घरच्या पेक्षा त्याच्या घरचे खरंच accept करतील ? तिला काही टोमणे मारले तर ? त्रास दिला तर ..?? अनेक प्रश्न होते .. चित्रा पुढे प्रेमाचे धुके होते त्यामुळे पुढचे प्रश्न तिला दिसणे शक्यच नव्हतं ..
सोनाली तिला हे सर्व सांगणार तेवढ्यात तिच्याकडे तिचा एक चुलत भाऊ आला मग ती आणि सोनाली त्याच्याशी झोका , प्रपंच , श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या सिरीयल गप्पा बद्दल मारत बसले . पण तेवढद्यात खूप जोरात पाऊस पडायला लागला तो हि चक्कं मे महिन्यात !! आधी बरंच वादळ आणि नंतरचा पाऊस ( निसर्ग अनेक संकेत देत असतो ..आपणच लक्ष देत नाही .. हि अंधश्रद्धा नाही ... अनुभव आहे ) .. सोनाली ला जायचे होते घरी निदान ८ पर्यंत तरी .. तिचा चुलत भाऊ म्हणाला मी सोडतो माझ्याकडे स्कुटर आहे ..
सोनाली खुश झाली पण मनातून वाटत होते नको जायला एका अनोळखी मुलाबरोबर !! तेवढ्यात चित्राचे बाबा म्हणाले " मुली , एवढ्या पावसात मी तुला पाठवू शकत नाही आज रात्री इथेच राहा .. घरी फोन करून कळव ..काळजी करू नकोस .. " सोनालील बरं वाटले आणि ते पटलेही तिने घरी फोन करून कळवले आणि घरच्यांनीही पण चक्कं कधी नव्हे ते परवानगी दिली ...
मग दोघीनी खूप गप्पा मारल्या .. जेवण केले .. जेवताना सोनाली सगळ्याशी बोलत होती अगदी चित्राच्या चुलत भावशीही .अगदी सहज .. निरागस पणे . पण चुलत भाउशी बोलताना का कोणास ठाऊक पण चित्राच्या भावाला आवडत नव्हते चक्कं तो तिथून उठून गेला .. सोनालीला थोडे वाईट वाटले आणि खटकलेही .. मनाने समजूत घातली आपण आलेलो कदाचित आवडले नसावे ... चुलत भाऊ मग स्कुटर ने त्याच्या घरी एकटाच गेला ..
त्या दिवशी सोनाली चित्र कडेच राहिली .रात्रभर पण दोघी बोलत होते ..काकू मात्र वैतागलेल्या !!
दुसऱ्या दिवशी सोनाली आणि चित्रा आवरून आता घरी जाणार तेवढ्यात काकू म्हणाल्या, "अगं इथपर्यंत आलीच आहेस तर देवीचे मंदिर आणि जैन मंदिर पाहून जा ".. चित्रा पण म्हणाली "अगं चल ना ..खूप सुंदर आहे मंदिर " काकू म्हणाल्या चित्राला " दादाला सोबत घेऊन जा ..कारण मंदिर पहाडावर आहे आणि माणसांची गर्दी पण कमी आहे ".. तिचा दादा पण चक्कं तयार झाला ...
मंदिर खूप सुंदर होते कधी नव्हे ते चित्राचा भाऊ थोडाच पण बोलत तरी होता ..माहिती सांगत होता . सोनालीला कौतुक वाटले किती सज्जन आहे हा मुलगा .. काल आलेला तिचा चुलत भाऊ खूप वेगळ्या नजरेने बघत होता आणि हा कसा निर्मळ .. आपल्याला जर कोणी भेटले तर तो असाच असावा !! आपला ११वी ला ऍडमिशन घेताना चित्रा आणि सोनाली भेटलेलो कॉलेज ला तेव्हा हा पण होता सोबत तर ह्यानेच आपले तेव्हा हात दुखत होते म्हणून चक्कं पूर्ण टाइम टेबल लिहून दिलेले वहीत.. अर्थात चित्राचा भाऊ हा आपलाही भाऊ .. त्यामुळे वेगळे विचार नकोत यायला ..
मंदिर पाहून आल्यावर सोनाली घरी जाण्या अगोदर दोघी चित्राच्या खोलीत गप्पा मारत होते .. ..
सोनाली म्हणाली, "आता आपण महत्वाचे बोलू या .. "
चित्रा उत्सुक होतीच ऐकायला ..सोनाली serious पणे म्हणाली, " तो मुलगा चांगला आहे मान्य आहे .. एकमेकांना आवडता हे पण खरंच आहे .. ..पण खरंच त्याची लग्नाची तयारी आहे ?? तुझी पण वेगळ्या लोकांशी जुळवून घेण्याची तयारी आहे ?? आपले आणि त्यांचे विचार वेगळे आहेत .. आर्थिक परिस्थिती पण वेगळी आहे ?? तुझ्या घरचे साधे आहेत .. हा धक्का पचवू शकतील ?? मुलाच्या घरचे तुला accept करतील ?? "
चित्रा रागाने म्हणाली ," हो .. तो डॅशिंग आहे दिसत नसला तरी!! ..तो घरच्यांशी माझ्यासाठी बोलायला तयार होईन आणि हो माझ्याशी लग्न करेन सगळ्याचा विरोध पत्कारून .."
सोनाली म्हणाली ,"अगं काल त्या मुलाने तुला काल पाहिल्यावर घरात पळून गेला तो तुझ्यामागे ठाम राहील ??मला नाही वाटत तो तुझ्याशी लग्न करेन !!, सॉरी पण मला जे वाटलं ते बोलले कदाचित मी चुकीची पण असेन "
चित्रा हे ऐकून गारच पडली आणि चक्कं तिचा चेहरा पडला .. कदाचित सोनाली तिची बाजू घेईन असं वाटलं असेन .. चित्रा आता खरंच
अस्वस्थ होत होती !!
सोनाली म्हणाली " चित्रा !! मला वाटतं तू त्याच्याशी स्पष्ट बोलावं ..मगच काय ते कळेन.. उगाच तू जास्त गुंतू नकोस ..अपेक्षा ठेऊ नकोस आणि हो चित्रा ... तू त्याला भेटू नकोस जो पर्यंत व्यवस्थित उत्तर येत नाही ! "
चित्रा म्हणाली ,"म्हणजे?? काय बोलू मी त्याच्याशी ??"
सोनाली म्हणाली ," तू फक्तं म्हण मलाही तू आवडतोस आणि मलाही तुझ्याशी लग्न करायचंय .. जर मी खरंच आवडत असेन तर माझ्या घरी माझ्या बाबांशी बोलायला ये !! "
चित्रा आनंदाने म्हणाली ," हो ! मी असंच बोलेन !"
आता मात्र चित्रा रिलॅक्स झाली होती आणि सोनाली मात्र अस्वस्थं !! कदाचित सोनालीला पुढचे अगोदरच कळलेले कि काय ....
सोनाली आता घरी जायला निघाली कारण सकाळचे ११ वाजलेले ..घरी सकाळी फोने करून कळविलेले लवकर येईन म्हणून ..
काका, काकू,ताई चा निरोप घेऊन निघाली . चित्राचा दादा मात्र दिसला नाही आता खूपच सोनाली ला वाईट वाटत होते .. साधा निरोप पण देऊन नये ???
इतके आपण आवडत नाही माणूस म्हणून ..
सोनालीने जाताना चित्राला बाय करायचे म्हणून मागे वळून पहिले तिच्या घराकडे तर तिचा दादा चक्क बाल्कनीत उभा होता आणि सोनाली कडे वेड्यासारखा बघत होता .. .. त्याचे डोळे काहीतरी सांगत होते ..जणू काही आपली ही शेवटची भेट !! सोनालीला वेगळंच वाटलं पण हा आपल्या मनाचा वेडेपणा असं समजून तिनेही त्याला सहजच हसत हसत बाय केले ..
२ महिने झाले .. सोनाली कडे चित्राचे एक पत्रं आले ..नेहमीप्रमाणे छान उलट जास्त संयमित आणि matured वाटत होते पत्रं .. अगदी २ पानी .. सोनालीला उतुकात होती चित्राच्या आयुष्यात (?) आलेल्या त्या मुलाची .. शेवटचा पॅराग्राफ होता .. सहज लिहिलेला .. चित्राने लिहिलेलं "अगं त्या मुलाला मी विचारलं तू जे म्हणालीस ते पण त्यानंतर दोन आठवड्यानंतर त्याचे आई -बाबा आले माझ्या आई -बाबांना भेटायला आले ....... कशासाठी माहितेय का ?? त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन !!! ..... असो मला खूप वाईट वाटलं पण .. पण .. मी आता बरीच सावरलेय आणि विसरतेयही तसाही तू सल्ला दिलेलास कि जास्त गुंतू नकोस म्हणून ..तर तु काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे "
सोनालीला मात्र हे वाचून धक्का बसला आणि गप्प झाली .. बघता बघता तिच्या डोळ्यात पाणी कधी भरून आले कळलं नाही!!!!!!!!.. जणू तिचे स्वतःचेच स्वप्नं भंग पावले .... स्वप्नातून आता चित्रा नाही तर सोनालीच जागी झाली होती...... वास्तवाचे काटे जाणवू लागले .. सोनालीचे डोळे अजूनही भरून येतात .. जणू आपल्यामुळेच हे घडले असं तर तिला वाटत नाही ?? कि तिचे पण स्वप्नाळू जग तेव्हाच संपले कि काय हे जाणवू लागले ?? देव जाणे !!!! ...
सोनालीने मात्र नंतर चित्रा शी संपर्क नंतर मुद्दाम कमी ठेवला ..चित्राला अजूनही कळले नाही सोनालीने तिच्याशी संपर्क का तोडला ते.. कारण कारण फक्त सोनालीलाच माहित !!!!
-- वृंदा ( हि कथा काल्पनिक आहे त्याचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही ..त्यामुळे कोणीही निदान चुकीचे तर्क करू नयेत )

मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

दहा पंधरा दिवसां पूर्वीची गोष्ट असेन , मला पुण्याहून मुंबई ला सकाळी जायचे होते . सकाळची ट्रेन होती ७:५० ची पण नेहमीप्रमाणे घाई झालीच ! वाटलं चुकतेय कि काय ट्रेन ! (हो... पण मुंबई वरून पुण्याला येताना कधी ट्रेन चुकली नाही कि उशीर झाला नाही अगदी ६:५० ची मुंबई-पुणे इंटरसिटी असली तरी ) सकाळी कसंबसं आवरून ७:३० एकदाची निघाले घरातून. ७:३३ ला रिक्षा मिळाली. रिक्षावाल्या काकांना सांगितलं लवकर पोहोचवा स्टेशन वर. रिक्षात बसताना समोर पहिलं तर लिहिलेलं "श्री स्वामी समर्थ " माझा चेहराच पडला खरंतर ते माझे आराध्य दैवत पण सध्या त्यांच्यावर नाराज होते त्यामुळे त्यांचा नाव पाहिल्यावर कसंसच झालं आणि आपल्याला काही ट्रेन मिळायची नाही असच वाटलं पण म्हंटलं try तर करू तसंही धावती रेल्वे गाडी पकडायची fantasy अगदी DDLJ पासून होती :) मग काय ! पण रिक्षा काही ३५ च्या स्पीड पुढे जात नव्हती तसं ही पुण्यातले रिक्षावाले कधीच स्पीड ने रिक्षा पळवत नाही. सगळा कसा रमतगमत मामला असतो पुण्यात घाई फक्त two wheeler वाल्यांना. मी दोनदा जोरात चालवा म्हणाले पण पालथ्या घड्यावर पाणी ! ते ऐकतील तर पुण्यातले रिक्षा वाले कसले !! त्यात जाताना प्रत्येक देवाला नमस्कार करत जात होते आणि हसून म्हणतात अहो आता गाडी मिळेल कि नाही कोण जाणे !! मला खूप राग आला म्हणे देवाचे भक्त आणि दुसऱ्याच्या अडचणींवर हसतात . मनातल्या मनात स्वामींना म्हणाले बघा तुमचे भक्त दुसऱ्याला हसतात आणि असुरी आनंद मिळवतात.
असो , मग शेवटचा सिग्नल लागला जो अगदी १:३० मिन असतो आणि माझ्या घड्याळात तर ७:४७ झाले होते पण नंतर लक्षात आले माझे घड्याळ तर ४ मिन पुढे आहे सो अजून ७ मिनिटे होती आणि कधी कधी १-२ min उशीर पण होतो ट्रेन सुटायला ! पण हाय रे दैवा... रिक्षावाल्या काकांनी signal तोडलाच. मी अजिबात सांगितले नव्हते पण त्यांना उपरती झाली असावी मला मदत करायची. स्वामींचीच कृपा म्हणायची ! पण नेमका पुढे पोलिसमामा दिसला मग काय अबाऊट टूर्न ! त्यांनी मग दुसऱ्याच लांब रस्त्याने रिक्षा पळवली कारण परत सिग्नलला थांबलो असतो आणि मग सिग्नल सुटल्यावर पोलिसमामाने पकडले असते . पोलीस ला २०० रुपये देण्यापेक्षा माझी ट्रेन सुटली तरी रिक्षावाल्या काकांना परवडले असते (त्यांनी स्वतःचाच विचार केला..टिपिकल मेन्टॅलिटी) शेवटी माझी train हुकलीच ! (ही पण स्वामींचीच कृपा वाटतं ... कारण दुसऱ्या रस्त्याने स्टेशन वर यायचा तब्बल १० min लागले ) मग काय .. चेन्नई मेल ची ९:३० पर्यंत वाट पाहायची किंवा लोणावयावरून दुसरी ट्रेन पकडायची असं ठरलं .पण मुंबई ला लवकर पोहोचणे महत्वाचे होते. मग शेवटी पुणे ते लोणावळा(लोकल ) , लोणावळा ते कल्याण (हैद्राबाद एक्सप्रेस ), कल्याण ते माझं स्टेशन (लोकल) प्रवास केला आणि कशीबशी १:३० पर्यंत पोहोचले. नंतर मी हा प्रसंग विसरून गेले .
नंतर एक आठवडयांनी t.v न्यूज वर बातमी आली कि एक मुलगी एक्साम ला उशीर होत होता म्हणून धावती इंद्रायणी एक्सप्रेस पकडायला गेली आणि तिला पाय गमवावे लागले !! अगदी त्या प्रसंगाचे CCTV फुटेज पण दाखवत होतें .जीव खूप हळहळला. थोडा उशीर परवडतो पण उगाच घाई कशाला करायची होती दुसरी गाडी मिळाली असतीच कि ! मग एकदम strike झालं आपलं पण त्या दिवशी असंच झाला असतं तर?? आपल्याकडे luggage पण होतं ट्रेन कदाचित मिळाली पण असती पण अशी धावती ट्रेन पकडणे जमले असते का ??? जर रिक्षावाले काकांनी सिग्नल तोडलाच नसता तर ?? त्यांनी रिक्षा खूप जोरात पळवली असती तर ?? मन २ min सुन्न झालं ..
पण एक धडा शिकले.... जे होता ते चांगल्यासाठीच... ... कधी आपल्याला लवकर कळतं तर कधी उशिरा ... -- वृंदा

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

साधारण दीड महिन्यापुर्वीची गोष्ट आहे .खूप दिवस मनात होत लिहायचं कोणी वाचू किंवा ना वाचू पण जे वाटलं ते सांगायचंय म्हणून लिहीत आहे.
माझा handsome मावस भाऊ सुरज सहजच घरी आला होता खूप दिवसांनी .. खरंतर त्याचं बोलणे मला खूप छान आणि पॉझिटीव्ह वाटतं. खुश असते त्याला भेटले कि त्यालाच काय पण सौरभ , श्रीधर भेटले कि पण छान वाटतं कंदाचीत मी आई वडिलांची एकुलती एक असल्यामुळे .. मुख्य म्हणजे बाहेरील जगाच्या अनेक गोष्टी कळतात . माहित नाही पण सुरज चा easy going , cool attitude भारीच वाटतो .आणि त्यात त्याचे मुद्देसूद बोलणे कधी कधी समोरच्याची योग्य पद्धतीने बोलती बंद करतो .
असंच खूप गप्पा झाल्या आणि तो निघाला. जाताना सहज म्हणाला मग कसा आहे अनुभव मुंबईचा , फरक कळला का पुणे आणि मुंबई माणसामध्ये . मुंबईची माणसे मदत करतात, माणुसकी असते . पुण्यातली पण वाईट नाहीत पण माणुसकीही नाही जवळजवळ . जेव्हा तो म्हणाला तेव्हा खूप राग आला आणि म्हणाले काही काय ... नाही वाटला असा काही फरक .. उलट तिथली लोकं किती robotic एकाच्या पण चेहऱ्यावर एक्स्प्रेशन नसतात . सारखे घाईतच असतात . कसं काय life एन्जॉय करतात कोण जाणे ... पुण्यातले बघ कसा life एन्जॉय करतात.. दार वीकेंड ला बाहे रouting , हॉटेलिंग किंवा movie पाहतात (सगळीच नाही काही पण शक्यतो ).. अगदी हौशी रसिक आहेत ..life कसं भरभरून जगतात ... तसंही आजकाल कुणाच्यातच माणुसकी दिसत नाही .. सगळे स्वतःचाच विचार करतात .. दुसऱ्यांना मदत करणे तर आता "out dated " झालाय न मुंबई तर कुणाला वेळ पण नसतो मदत करायला :)
सुरज माझ्या बोलण्यला ला हसत हसत म्हणाला ... कळेल ..... कळेल आणि असं बोलून घरी निघाला ...
नंतर २-४ दिवसात एक प्रसंग घडला. ..माझ्याबद्दल नाही पण तरीही मला खूप काही सांगून जाणारा ..
दिवस : धनत्रयोदशी २८/१०/२०१६
वेळ :साधारण ४:३० वाजता
ठिकाण : ठाणे स्टेशन
त्यादिवशी प्रगती ने पुण्याला जायचंच होता कारण दुसऱ्या दिवासापांसून दिवाळी सुरु होणार होती आणि माझा मन काही इथे रमत नव्हतं आणि घराचं ओढ पण खूप वाटत होती . अर्थात दिवाळी मुळे माझा नंबर वेटिंग लिस्ट ला होता पण १ तास अगोदर कन्फर्म तिकीट चा sms आला होत पण तरी खात्री करावी प्लॅटफॉर्म लिस्ट ला म्हणून लवकरच निघाले तसा अजून अर्धातास वेळ होता त्यामुळे मी बोर्ड वरची waiting list चेक करत होते .सगळे पेपर्स पहिले पण माझा नावाचं नव्हतं अगदी एकूण एक पेपर list चेक करत होते, अगदी खाली जमिनीवर पडलेले पण पेपर list पण बघत होते ani आश्चर्य करत होते मग कन्फर्म चा message कसा आला?? तिथली काही माणसे माझे एक्स्प्रेशन आणि असं वागणं पाहून आश्चर्याने बघत होते ( खूप वेळा नंतर कळलं मी तिकीट बुक तर "दादर to पुणे "केला होतं मग माझ्या नावाची list दादर ला दिसणार ना .. वेडेपणा माझा आणि काय :) ) शेवटी दमून तिथेच एका खांबाच्या बेंच वर बसले आणि ट्रेन ची वाट पाहत बसले
त्यादिवशी लोकल ला खूप गर्दी दिसत होती. संध्याकाळची वेळ त्यामुळे down ला तशीही गर्दी होती पण आज दिवाळी मूळे सगळ्या लोकल इतक्या भरलेल्या होत्या कि एखादा फुगा फुगतो तसा आणि कधी स्फोट होईल गर्दीचा असाच वाटत होतं. कर्जत ची लोकल तर इतकी भरली होती कि मी थोडी किंचाळतेच "बाप रे .!!!!. इतकी गर्दी !! " माझ्या शेजारी बसलेली मुलगी माझ्याकडे पाहायला लागावी कि हिला काय झाले.. अशी गर्दी नॉर्मल च असते असेच तिचे एक्स्प्रेशन होते.
तेवढयात दुसरी लोकल आली कल्याण ला जाणारी .प्रचंड गर्दी होती इतकी कि उतरणारे खूप आणि तेवढेच चढणारे .. आणि लोकल तर अर्धा मिनिट थांबते. तेवढया माझ्या समोर थांबलेला डब्यातून उतरताना थोडा आवाज येत होता माणसांचा ओरडल्यासारखा आंणी कोणा माणसाला बाकीच्यांनी धरलेले मला वाटलं चोर आहे कि काय पण नंतर कळले एका माणसाला चक्कर आली म्हणून सगळ्यांनी पकडलंय तो पडू नये म्हणून. मग त्याला बाकीचा २-३ माणसांनी माझ्या समोरच्या खांबाच्या बेंच वर बसवलं आणि तिथेच एक २३-२४ वर्षांचा साधा गरीब मुलगा बसला होता त्याला म्हणाले ह्यांची काळजी घे आम्ही निघतो पुढची ट्रेन आहे तो पण म्हणाला मी बघते काळजी करू नका . मग बाकीचे सगळे निघाले .तो माणूस जवळ जवळ बेशुद्ध होता .चेहऱ्यावरून खूपच थकला ला होता. बहुकेत मध्यमवर्गीय नॉर्थ इंडियन होता एकंदर दिसण्यावरून आणि पेहरावावरून. ५ -१० मिन झाली तो जवळ जवळ बेशुद्ध होता असं वाटत होता त्याला आता attack येतो कि काय मी शेवटी न राहवून म्हणाले त्या मुलाला रेल्वे पोलीस ना बोलवा त्यांना ऍडमिट करा हॉस्पिटल मध्ये किंवा त्यांच्या घरच्याना कॉल करा. माझ्या शेजारी बसलेल्या हिंदी बोलणाऱ्या ऑंटी पण तेच बोलत होत्या तो मुलगा मात्र शांत होता म्हणाला थांबा थोड त्यांना शुद्धीवर तर येऊ दे. ५ मिन ने त्या माणसाला शुद्ध आली आणि तो पाणी पाणी म्हणत होता मग त्या मुलाने पाण्याची बाटली दिली .
पण त्याला खुपच तहान लागलेली मग शेवटी तो मुलगा मला म्हणाला "मॅडम प्लीज सामानाकडे आणि माणसाकडे लक्ष ठेवा मी लगेच येतो " मी म्हणाले ' डोन्ट वरी मी आहे इथे . मी लक्ष ठेवते." तो पर्यंत तो बरं नसलेला माणूस बेंच वरच झोपला २-३ मिन मुलगा पाण्याच्या बाटली घेऊन आला होता समोरचा माणूस आता शुद्दीवर होता बऱ्यापैकी त्या मुलाने पाण्याची बाटली दिल्यावर तो पैसे द्यायला लागला मुलाला पण त्याने घेतले नाही उलट अजून एक बाटली तुमच्याकडे ठेवा असं हिंदी मध्ये बोलत होता. त्याने पाणी पिले आणि अचानक त्याला उलटी झाली ती हि प्लॅटफॉर्म वरच . परत जेव्हा उलटी सारखं त्याला वाटलं तेव्हा तो प्लॅटफॉर्म वरच पण ट्रॅक जवळ गेला उलटी करायला नशीब!! मागून कुठली लोकल येत नव्हती नाहीतर तेव्हाच खेळ खल्लास झाला असता (कारण दर ३ मिन ट्रॅक वर एक तरी लोकल येतेच !).
२-४ उलटी झाल्यावर मात्र त्याला खूपच बारा वाटलं. आता चांगलाच जागा झाला होता मग त्या मुलाशी बोलत होता ... मुलगा म्हणत होता तुम्हाला घरी सोडू का पण तो माणूस म्हणाला मी आता ठीक आहे मी जातो एकटा ..मग त्याने रुमालाने तोंड स्वच्छ पुसले .चष्मा पुसला आणि एकदम शांतपणे जणू काहीच झालं नाही असा निघाला.. फक्त शिट्टी वाजवायची राहिली होती इतका cool पणे निघाला . ... आणि मी बघत राहिले
तो प्रसंग पाहून त्या मुलाचा कौंतुक वाटलं. म्हण्टलं तर साधाच प्रसंग काही खास नाही पण त्या मुलाने दाखवलेली माणुसकी आणि आणि त्या माणसाने तो प्रसंग सहज पचवला हे पाहून आश्चर्य वाटलं आणि आनंद पण वाटलला.
शेवटी ५:१० माझी लाडकी प्रगती एक्सप्रेस आली तो मुलगा बहुतेक त्याच गांधींची वाट पाहत होता कारण तो general डब्यात आणि मी ladies डब्यात चढले . मी तर कन्फर्म आणि तेही window सीट मिळाल्यामुळे खुश होते . तेवढ्यात एक ऑंटी ज्या थोड्यावेळापुर्वी प्लॅटफॉर्म वर शेजारी बसल्या त्या माझ्या जवळ आल्या आणि मोठ्या आवाजात हिंदी मध्य म्हणाल्या " वो आदमी गया क्या घर पे ठीक से ??? " . आजूबाजूचे सगळ्या बायका मुली माझ्याकडेच बघायला लागल्या . मी ऑन्टी ना एक मोठी smile दिली आणि म्हणाले " ऑन्टी , वो आदमी ठीक से खुद्द चलते चलते . गया .एकदम ठीकठाक होके .. वो लडके ने बहुत मदद की "... ऑन्टी पण खुश होऊन त्यांचा सीट वर बसायला गेली ..
माहित नाही पण त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य आणि खूपसं समाधान होतं ... :) मनातल्या मनात सुरज ला म्हणाले तुझंच बरोबर होतं. पण Half Truth कारण पुण्याची माणसांना माणुसकी नसते हे कुठं सिद्ध झालंय कदाचित हे सिद्ध करायला अजून एक प्रसंग घडला असावा..
*************************************
दिवस : शुक्रवार ०४/११/२०१६
वेळ :साधारण ३ वाजता
ठिकाण : " विष्णू जी कि रसोई " थाळी रेस्टॉरंट , एरंडवणें
त्या दिवशी काकाचा birthday असल्यामुळे फक्तं घरचे मिळून बाहेर जेवायचे ठरले. मी कटाक्षाने घरच्यांच्या बर्थडे बाहेर जातो. मजा म्हणून नाही पण त्या दिवशी सगळ्यांनाच विश्रांती म्हणून .. नाहीतर वर्षभर बाहेरचे जास्त खात नाही आम्ही ... अगदी हौशी पुणेकर असूनही ....
जरा हटके मेनू आणि बऱ्यापैकी जवळ म्हणून विष्णू जी कि .. ला जायचे ठरले .
खरंतर आज खूप उदास आणि चिडचिड होत होती त्यात reception वर असणारी मुलगी फोन वर बोलत होती आणि आमच्याकडे लक्ष देत नव्हती (कारण साधी माणसं ..श्रीमंत नाही ना ..) असं कोणी ignore केलं कि मला खूप राग येतो अजूनच चिडचिड होत होती पण राग कंट्रोल केला आणि कूपन घेऊन आत गेले . आतमधील ambiance खूप आवडला. साधाच पण ओपन space होता . सेल्फ सर्विस बुफे होतं जे मला नाही आवडत फारसं . पण जे आहे ते accept करणे भाग होतं . जेवणात खूप variety होती. मुगाचा हलवा,वांग्याची भाजी,शेवेची भाजी मूग आणि चवळी उसळ, नागपुरी वडाभात (जो थोडा शिळा वाटला ..सगळ्यांनाच ).. जवळ जवळ नागपुरी बेत पण पुण्याचा चवीचा ( इथे जास्त कोणी तिखट खात नाही )..चव तशी छान होती पण हळू हळू लक्षात आलं सगळंच खूप तेलकट आणि तुपकट आहे ज्याची आम्हाला अजिबात सवय नव्हती. पोळी ला पण आम्ही खूप कमी तेल वापरतो.असो .
जवळ जवळ ३ पर्यंत जेवण होत आलं होतं .. काकाचे पण जेवण संपलेलं तेवढ्यात काका म्हणायला लागला मला खूप चक्कर येतीये .. सुरुवातीला वाटलं असाच म्हणत असेन वय झाला कि माणूस थोडं झाला तरी खूप झालंय असं म्हणतो पण मग लगेच लक्षात आले त्याला खरंच चक्कर येतीये. मग जेवण अर्धवट टाकून उठले लगेच मी आणि हात धुतला. त्याच्या समोरच ताट दुसऱ्या टेबले वर ठेवली आणि त्याच्याशी बोलायला लागले. सारखा चक्कर येतीये असं म्हणत होता . आई ला सांगितलं कदाचित त्याचा लो बाप झालंय तू त्याची पल्स चेक कर मी काय करता येईन का बघते.रिक्षा बोलावते आई म्हणाली पल्स लागत नाहीये मग मात्र खूप घाबरले . २ मिन ब्लॅक झाले मग ठरवलं डॉक्टर कडे न्यायला पाहिजे अशा प्रसंगात आपण ऍम्ब्युलन्स ला फोने करतो पण मी वेडी रिक्षा आणायला धावले ( अशा प्रसंगात कधी कधी योग्य सुचत नाही ). एरंडवणं तास शांत भाग. त्यात दुपार त्यामुळे जास्त गाड्यांची गर्दी नव्हती शेवटी रिक्षा मिळाली त्याला विनंती केली २ मिन थांबा मी patient ला घेऊन येते. आत मध्ये गेले तर काका अजूनही बेशुद्ध होता मग लक्षात आले त्याला पाणी द्यावे मग बारा वाटेनं त्याने २ घोट नाही पिला आणि लगेच उलटी झाली जेव्हा उलटी झाली तेव्हा लगेच लक्षात आले हा तर ऍसिडिटी चा अटॅक आहे आता काका नक्की बारा होणार ( कारण मुंबई चा प्रसंग आठवला..त्या माणसाला उलटी झालव्यावरच बरं वाटलं) मी म्हणले आई ला २ मिन त्याला रेस्ट घेऊ दे मी रिक्षावाला अजून थांबलाय का बघून येते पण बाहेर आले तर रिक्षावाला गायब !!!!!
मग परत आतमध्ये "तानमान " बघायला गेले .काका बराच शुद्धीवर होता आणि बोलत पण होता मग हे पाहून रिलॅक्स झाले .तिथलं कॉ-ऑर्डीनटोर मग विचारायला लागला काय झालं . खरंतर इतक्या वेळ कुणाचा साधा लक्ष पण गेला नाही कि कोणी आम्हाला विचारायला आला नाही अगदी तिथे काम करणारे गांधी टोपी वाले वेटर पण धावून आले नाहीत. सगळी कडे एक कटाक्ष टाकला.. सगळे शांतपणे enjoy karat जेवत होते त्यातला एकाच पण लक्ष नव्हता हे शक्यच नव्हतं .. त्यातले अनेक जण श्रीमंत होते काही तर नवश्रीमंत इथे येणारे काही काही पुण्याचे तर काही नागपूर विदर्भाचे असतील पण एक जण मदतीला धावून ला नाही कि साधं विचारलं पण नाही हेल्प हवी का ? म्हणून... फक्त एक कॉ-ऑर्डीनटोर काकाला उलटी झाल्यावर विचारायला आला कारण त्याला त्याच्या रेस्टॉरंट च्या रेप्युटेशन ची पर्वा होती माणुसकी ची नाही !!!! माणसाचा एक चेहरा कळला ..... तो पाहून नकळत डोळ्यात पाणी आलं पण सावरल स्वतः ला आणि आई ला म्हणाले मी परत रिक्षा बघते डायरेक्ट हॉस्पिटला काकाला ने ( अजूनही ambulance बोलवावे सुचले नाही...... .हद्द झाली ..एक दम बत्थड आहे मी ..hopeless ) कारण मी स्कुटी टी वर आले होते रेस्तरॉ ला आणि बाकीचे रिक्शा ने. कॉ-ऑर्डीनटोर बोलले व्हील चेअर असेल तर बघा तो म्हणाला आहे मी म्हणाले मी रिक्षा बघते आणि मिळाली कि सांगायला येते. नशिबाने एक रिक्षा मिळाली मी त्याला तंबी दिली सोडून जाऊ नका... मी लगेच येते. एक मात्र बरं तो खरंच थांबला होता मग व्हील चेअर वर त्या कॉ-ऑर्डीनटोर ने थोड्या अंतरावर नेले मग पायरी होती मी म्हणाले दरवाजापर्यंत कुणाला याला सांगा हि विनंती आहे मग एक नोकर जो गांधी टोपी घातलेला कसाबसा तयार झाला मग दरवाजा ते रिक्षा मी आणि आई ने नेले .तो माणूस साधा रिक्षा पर्यंत पण आला नाही उलट झिडकारल्या सोडलं काकाला . ...
मग शेवटी डॉक्टर ना दाखवले ते म्हणाले ऍसिडिटी चा अटॅक आहे बाकी काही नाही ( कारण सकाळी काका नेहमी प्रमाणे नाश्ता न करता direct जेवला होता )
दुसऱ्या दिवशी आई ने सांगितलं .अगं वृंदा ..व्हील चेअर वरून दरवाज्यापर्यंत सोडायला तिथले कुठलेच नोकर तयार नव्हते सगळे म्हणाले आमचा काही हे काम नाही म्हणून पण त्या हायफाय कॉ-ऑर्डीनटोर ने शेवटी आणलं व्हील चेअर वरून दरवाज्यापर्यंत.. ...चांगला होता तो .. तेव्हा हसून तिला म्हणाले..ते काही माणुसकी म्हणून नाही आणला काही... त्यांना त्यांचा रेस्तरॉ च्या रेप्युटेशनची काळजी होती आणि अशी ब्याद(प्रसंग) लवकर बाहेर गेलेलीच हवी होती ह्यांना कारण कमी जास्त झाला तर त्यांच्या हॉटेल ची बदनामी व्हायची ..
आता मात्र माझ्या डोळ्यासमोर आता तो २३-२४ वर्षाचा गरीब मुलगा, तो मुंबई चा आजारी माणूस आणि सुरज आले आणि टचकन डोळ्यातून पाणी आले ...
हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही .. पुणे कि मुंबई हा वाद नको कारण माणुसकी हि वृत्ती आहे पण एक मात्र नक्की गरीब असो कि श्रीमंत मी दोन रूपे बघितली.. एक माणुसकी असलेली आणि एक माणुसकी अजिबात नसलेली ... ---- वृंदा